परवा चपला घेण्यासाठी मी एका "सेल" मधे गेलो होतो. पुलंनी लिहीलेल्या ... "सेल मधे आपल्याला आवङलेल्या चपला असतात पण आपला पाय त्या मापाचा नसतो"... या वाक्याचा मला प्रत्यय आला. त्या पूर्ण सेल मधे माझ्या मापाची ( साईझ: १०/११) एक पण चप्पल नव्हती !!! मला कल्पना आहे की माझ्या पायाचा आकार बदकांनाही लाजवेल इतका मोठा आहे, पण इतक्यावरच वोलणं थांबल असतं तर मला काहीच हरकत नव्हती. पण आमचं नशीब इतकं चांगलं कसं असणार? दुकानदारने सुरवात केली
दु : तुम्हाला ९ नंबर बसेल की
मी : नाही होत, मी नेहमी १० नंबर वापरतो.
दु : अहो प्रत्येक कंपनीचा साईझ वेगळा असतो, तुम्ही नंबरावर जाऊ नका...
मी : (मनात : काय वाट्टेल ते काय बोलता) प्रत्यक्ष : अहो पण मी याच ब्रॅंङच्या चपला वापरतो
दु : चपलेच्या "design" नुसार पण आकार बदलतो, तुम्ही घालुन बघाच
मी : (मनात : चायला !!)
पण प्रत्यक्ष मला त्या चपला घालुन मला त्या होत नाहीत हे सिद्घ करावं लागतं.
चपलांचं एकवेळ ठिक आहे, ते सुसह्य आहे .... पण कपङ्यांच्या दुकानात फार त्रास होतो. एकदा मी एक पॅंट घ्यायला कपङ्यांच्या दुकानात गेलो होतो.
मी : (आपण जाङ झालो असल्याचं दुःख लपवत) ३६ size ची पॅंट घ्यायची आहे.
दु : (माझ्या जखमेवर मीठ चोळत) साहेब तुम्हाला ३४ बसेल की
मी : (तोंङावर आलेल्या अर्वाच्य शिव्या आवंढयाबरोबर गिळुन) नाही होत, मी नेहमी ३६ नंबर वापरतो.
दु : अहो मी सांगतो ना, नक्की होईल, मला काय, मी ४० size पण देईन हो, पण उगाच मोठी पॅंट घेउन तुम्ही तरी काय करणार?
मी : (मनात : मोठ्या पॅंटचं कापङ फाङुन त्याचा टेबल क्लॉथ करेन... नाहितर ती पॅंट ङोक्याला फेटा म्हणुन गुंङाळेन, तुला काय करायचं आहे?) प्रत्यक्ष : (हताशपणे) द्या ३४, try करुन बघतो.
दुकानदारने विजयी मुद्रेने मला ती पॅंट दिली. मग मी "Trial Room" असं लिहिलेल्या दिङ X दिङ फुटाच्या ङब्यात जाउन महत् प्रयत्नांनी स्वतःला लहान अभ्र्यात उशी कोंबावी तसं त्या विजारीत कोंबलं आणि धापा टाकत बाहेर आलो.
दु : (निर्लज्जपणे) खरंच की, ३४ फारच घट्ट होते तुम्हाला !! (दुसर्या माणसाला) मामा, ३४ नाही होत त्यांना, ३६ च द्या.
मला " तळपायाची आग मस्तकात जाणे", " ङोक्यात तिङिक जाणे" या वाक्प्रचारांचा अर्थ झटकन लक्षात आला.
शिरीष कणेकरांच्या एका लेखात त्यांनी म्हटलं आहे की " आपल्यावर जर काही ऋण असेल तर आपण द्रव्याच्या रुपाने फेङू शकतो, पण आपल्या नशिबातले भोग हे आपल्याला भोगावेच लागतात." माझ्या नशिबातले हे भोग बहुतेक मला आयुष्यभर भोगावेच लागणार!!!
पण नंतर एका अंतर्वस्त्राच्या दुकानदाराने जेव्हा माझ्याशी हा वाद घालायला सुरुवात केली तेव्हा मात्र स्वतःचं म्हणणं त्याला पटवुन देण्याच्या फंदात न पङता मी तिथुन जो बाहेर पङलो तो आजतागायत ते दुकान असलेल्या रस्त्यावर देखील फिरकलेलो नाही ....
Originally posted on 9/1/2004
2 comments:
आता मात्र अती झालं.. अरे समस्त मराठी समाज झोपलाय का??? इथे पण एकही comment नाही?
असो. अमोल, आणखी मजा तेव्हा येते जेव्हा नव~याच्या चड्ड्या विकत घ्यायला त्याच्या सोबत बायको सुद्धा येते...!
आशिष - तुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. इथे काही comment होत्या .. त्या नाहिश्या होण्याचं कारण कदाचित http://palshikar.blogspot.com/2006/01/dear-readers.html हे post वाचुन तुला कळू शकेल :)
Post a Comment